नोकरीची गुलामगिरी सोडा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करून महिन्याला ३० ते ४० हजार कमवा

Small Business Ideas In Marathi – मित्रांनो, जर तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा लोकप्रिय व्यवसायाची संपूर्ण माहिती देऊ, ज्याद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय ग्रामीण किंवा शहरी भागात कमी खर्चात सुरू करू शकता, हा व्यवसाय खूप यशस्वी होणार आहे. आम्ही तुम्हाला अशा तीन व्यवसायांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरणार आहेत, या तीन व्यवसाय कल्पनांसह तुम्ही यश मिळवू शकता.

तीन व्यवसाय कल्पना जाणून घेऊया ज्या तुम्हाला यशस्वी करतील –

मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी अशा तीन बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला रातोरात यशस्वी करू शकतात, त्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे, जर तुम्ही त्या योग्य पद्धतीने केल्या तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता, फक्त व्यवसायाशी तुम्हाला प्रामाणिक राहावे लागेल. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी वेळ द्या, तुमच्या व्यवसायावर अधिक प्रेम असायला हवे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेल आणि व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणाचेही गुलाम बनण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः स्वतःचे मालक असणार.

हे देखील वाचा – बिझिनेस आयडिया, फूड व्यवसायातून करा लाखोंची कमाई

1. सलून शॉप –

देशभरात लाखो सलूनची दुकाने आहेत हे तुम्हाला माहीत आहे, ते आपल्याला बघायला मिळतात, पण जरा विचार करा की आज तुमच्या घरात किंवा बँकेत पैसे पडून आहेत आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सलून चे दुकान टाकून तुम्ही खूप चांगली कमाई करू शकतात, कारण सलून चे दुकान किती ही असली तरी लोक प्रत्येक महिन्याला सलूनला जातातच आणि जर तुम्ही एखादा अनुभवी कारागीर ठेवलात तर तुमच्या कडे ग्राहकांची गर्दी वाढेल आणि गिर्हाईक पर्मनंट तुमच्या कडेच येणार. तुम्ही हा व्यवसाय अगदी सहजपणे सुरू करू शकता आणि आम्ही तुम्हाला सांगतो की सुमारे ₹ ५०००० मध्ये एक चांगले सलूनचे दुकान उघडले जाऊ शकते.
सलून दुकानाच्या व्यवसायातून महिन्याला तुम्ही ३०,००० ते ४५,००० हजार सहज कमवू शकतात.

2.स्पोर्ट्सचे दुकान (Sports Shop) –

मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की तुम्हाला देशभरात खूप कमी स्पोर्ट्स शॉप्स पाहायला मिळतील, आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही तुमच्यासाठी स्पोर्ट्स शॉप उघडले तर ते तुमच्यासाठी खूप चांगला व्यवसाय ठरू शकेल, तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यात जसे की सपोर्ट ड्रेसेस येतात, कपडे येतात, काही खेळाच्या वस्तू आहेत, तुम्ही क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल या सर्व वस्तू ठेवून एक चांगला व्यवसाय उभारू शकता आणि तुम्ही दरमहा 25 ते 30000 रुपये आरामात कमवू शकता. आणि यातच तुम्ही जर एखाद्या किंवा इतर शाळेच्या स्पोर्ट्स क्लब सोबत टायप केला किंवा त्यांना डिस्काउंट मध्ये तुमचे स्पोर्स्ट किट्स सप्लाय केलेत तर तुमचा व्यवसाय अजून जोरात चालेल यात काही शंका नाही. तुम्हाला फक्त शाळेतील स्टाफ सोबत बोलणी करून घ्यावी लागेल.

3. सजावटीचे दुकान (Decoration Shop) –

तुम्हाला माहिती आहेच की, सध्याच्या काळात डेकोरेशनच्या व्यवसायाला जास्त मागणी आहे, लग्न, समारंभ, बर्थडे, पार्टी अशा कार्यक्रमात सजावटीची गरज असते हे आपण पाहिलं आहे आणि त्यासोबतच तुम्ही हेही पाहिलं असेल. सजावटीसाठी मागणी देखील खूप आहे. जर थोडे पैसे आपण गुंतवले तर आपण हा व्यवसाय सहज सुरू करू शकतो, जरी यामध्ये खूप स्पर्धा आहे, परंतु जर आपण खूप छान सर्व्हिस दिली तर आपण महिन्याला ₹ 50000 सहज कमवू शकता,

सजावटी विषयी माहिती तुम्हाला Google किंवा youtube वर मिळेलच, तुम्ही सुरवातीला youtube वर बघून शिकू देखील शकतात की डेकोरेशन कसे केले जाते. तुम्ही बाजारतून होलसेल भावात डेकोरेशनचा सगळा सामान कमी किमतीत घेऊन येऊ शकतात. आणि विशेष म्हणजे या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक फक्त एकदाच करायची आहे. आणि जशी ऑर्डर मिळेल तसे लोकांना तुम्हाला सर्व्हिस द्यावी लागेल.
तुम्ही या व्यवसायाची सुरुवात स्वतःच्या घरातून देखील करू शकतात, किंवा आपल्या नातेवाईक पैकी कोणाचा वाढदिवस असेल त्याला कमी पैशात त्याचा कार्यक्रम तुम्ही हाती घ्या म्हणजे तुम्हाला देखील अनुभव येईल आणि आत्मविश्वास देखील वाढेल. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला ५०,000 हजार पेक्षा जास्त कमाई करू शकतात.

या पोस्ट देखील बघा –

Thank You,

Leave a Comment

close